श्री.दिपेश उपाध्ये गुरुजी हे गेल्या 13 वर्षांपासून ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि भारतीय अध्यात्मिक शास्त्रांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी वैज्ञानिक तसेच पारंपरिक (परंपरागत) भारतीय वास्तुशास्त्राचे सखोल अध्ययन केले असून, कोणतेही बांधकाम बदल न करता वास्तुदोष निवारणाचे प्रभावी उपाय सुचविण्यात ते तज्ज्ञ आहेत. वयाच्या 9 व्या वयापासून पाठशालेत शिक्षण घेऊन अनेक सर्टफिकेट, व सन्मानचिन्ह देण्यात आहे आहे गुरुजींनी वैदिक वास्तुशास्त्र, भूमी ऊर्जा (Earth Energy), धार्मिक विधी-विधाने जसे नवचंडी, गणेश याग, वास्तुशांती वेद तसेच ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचे सखोल अध्ययन व संशोधन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात सकारात्मकता, स्थैर्य व प्रगती अनुभवायला मिळाली आहे. अध्यात्मिक शिस्त, अनुभव आणि शास्त्रीय अभ्यास यांच्या आधारावर गुरुजी व्यवहार्य, विश्वासार्ह व परिणामकारक उपाय प्रदान करतात.